दूध दरामध्ये कपात न करता हमीभाव कायदा करायासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0

 

दूध दरामध्ये कपात न करता हमीभाव कायदा करा
यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

उस्मानाबाद : प्रतिनिधी
दूध दरामध्ये कपात न करता दुधाला हमीभाव कायदा करावा या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.८) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा सोमवारी (दि.५) जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, उन्हाळ्यामध्ये दुधापासून तयार होणाºया पदार्थांना चांगली मागणी असते. असे असतानाही मागील एक महिन्यांमध्ये दुधाच्या दरामध्ये लिटर मागे ५ रुपयाची घसरण झालेली आहे. मागील तीन महिन्यापूर्वी गाईच्या दुधाची किंमत ३८ रुपये प्रति लिटर होती. ती आज ३३ रुपये झाली आहे. अगोदरच उन्हामुळे व लंपी आजाराच्या अनुवंशिकतेमुळे दुधाचे उत्पादन घटले आहे. चाºयाच्या किंमती व पशुखाद्याचे भाव मात्र वाढलेले आहेत. असे असतानाही दुधाचे दर घसरल्यामुळे शेतीला पूरक उद्योग असणारा दुग्ध व्यवसाय हा अडचणीत येऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामध्ये दूध पावडर व लोण्याचे भाव घसरल्याने दुधाचे भाव कमी झाल्याचे दूध खरेदीदार सांगत आहेत. या पुढील काळात दुग्ध संस्था व खाजगी दूध संघ आणखी कमी करण्याच्या विचारात आहेत, असे समजते. त्यामुळे दूध दर कपात न करता पूर्वीप्रमाणेच दुधाचे दर ठेवावेत व त्याचबरोबर दुधाला हमीभाव मिळावा, यासाठी एफआरपी कायदा करण्यात यावा, शेतकºयांना खरीप पिक कर्ज त्वरित वाटप करताना काही राष्ट्रीयकृत बँका सिबिल व इतर कारणे काढून कर्ज नाकारत आहेत, अशा बँकेवर कारवाई करावी.सततच्या पावसाचे रुपये २२२ कोटी अनुदान शेतकºयांना त्वरित मिळावे. सन २०२२ या पिक विमा शेतकºयांना त्वरित देण्यात यावा. महात्मा फुले पीक कर्ज योजनेचे ५० हजार अनुदानास पात्र असणाºया सर्व शेतकºयांचे अनुदान त्वरित वाटप करावे. ६ हजार कांदा उत्पादक शेतकºयांचे अनुदान त्वरित मंजूर करून वाटप करावे. शासनाने हमी खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या हरभºयाची रक्कम त्वरित शेतकºयांना वाटप करावी. टेंभुर्णी लातूर महामागार्चे चौपदरीकरण मंजूर करून काम त्वरित चालू करावे व पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचे काम पूर्ण करावे, येडेश्वरी मंदिर ते बार्शी रोड ३.५ किमी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित मंजूर करून काम तरी चालू करावे, वीज दरवाढ रद्द करावी, मार्च, एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसान भरपाई त्वरित द्यावी, शेतकºयांच्या या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, यासाठी हे निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याचे दुधगावकर यांनी निवेदनात म्हंटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top