बस व लिक्विड टँकरची धडक , दोन्ही गाड्यांचे नुकसान, बसमधील प्रवासी सुखरूप - Bus and liquid tanker accident
उस्मानाबाद : राष्ट्रीय मार्ग क्रमांक 52 वर तुळजापूर जवळील उस्मानाबाद बायपास पुलाखाली महाराष्ट्र राज्य आगाराची बस व लिक्विड चा टँकर याची धडक बसून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 जून रोजी दुपारी12.20 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर तुळजापूर जवळ उस्मानाबाद पुलाखाली उस्मानाबाद कडून येणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH 40N9195 बस ही पुलाजवळ आली असता हैदराबाद कडून उस्मानाबाद दिशेने लिक्विड घेऊन जाणारा टँकर या दोन्हीची धडक होऊन मोठा अपघात झाला या अपघातामध्ये काहीजण किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळत आहे .सदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये 28 प्रवासी या मधील काही किरकोळ जखमी आहेत .
जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठवण्यात आले आहे .महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसचे व टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तर दोन्हीही गाड्यांमधील चालक वाहक व प्रवासी हे सुखरूप आहेत . सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्या आदेशावरून पोलीस हवालदार आनंद साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल महेश सावरे,पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर पाटील,पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोपळे,पोलीस कॉन्स्टेबल गणेश पतंगे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाली .गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती देण्यात आली आहे.