जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषदेत गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न
Osmanabad news : ,दि,11 ):- जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आज मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षते खाली सर्वोत्कृष्ट आशा स्वयसेविका,कायाकल्प कुटुंब कल्याण व फलॉरेन्स नाईटिगेल यांचा जिल्हा स्तरावरून गुण गौरव कार्यक्रम जिल्हा परिषदेतील कै.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडला. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरीदास, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदिप मिटकरी, निवासी वैदयकिय अधिकारी डॉ.मुल्ला, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अन्सारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दिपक मेंढेकर, वैदयकिय अधिकारी डॉ. सुशिल चव्हाण, सहसंचालक कुष्ठरोग डॉ. कोरे, जागतिक आरोग्य संघटना समन्वयक डॉ. गायकवाड, तालुकास्तरीय वैदयकिय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैदयकिय अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रमामध्ये जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वंयसेविका-रहिमुनिसा शब्बीर शेख, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड उस्मानाबाद, व्दितीय क्रमांक दैवता मोहन सोनकांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्र डिग्गी ता. उमरगा व तृतीय इंदुबाई मोहन कबाडे, प्राथमिक आरोग्य केंद्र अनदुर ता.तुळजापूर यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
कायाकल्प अंतर्गत ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र पारा ता. वाशी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असुन तर एकुण 17 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प अंतर्गत मानचिन्ह व प्रामणपत्र देवुन गौरविण्यात आले तसेच एकुण 11 शहरी भागामध्ये कायाकल्प अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय यांना मानचिन्ह व प्रामणपत्र देवुन गौरविण्यात आले.
कुटुंब कल्याण व फलॉरेन्स नाईटिंगेल च्या अनुषंगाने तालुकास्तरावर आरोग्य संस्थेमध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जनमध्ये प्रथम क्रमांक डॉ. राहुल यंदे, व्दितीय डॉ. के. एम. खारे व तृत्तीय डॉ सदाशिव राऊत यांना मानचिन्ह व प्रामणपत्र वितरीत करण्यात आले तसेच फलॉरेन्स नाईटिंगेल अंतर्गत आरोग्य सेविका एस.टी. सुरवसे, आरोग्य सहायक, के.बी कोकाटे स्टाफ नर्स माधुरी जाधव, स्टफ नर्स अनिता जाधव, यांना मानचिन्ह व प्रामणपत्र देवुन गौरविण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हयामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेनुसार जिल्हास्तरावर सर्व आरोग्य संस्था यांचे मुल्यमापन करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक तालुका कळंब, व्दितीय क्रमांक तुळजापूर व तृत्तीय क्रमांक भुम यांना प्राप्त झाला असून संबंधित तालुका आरोग्य अधिकारी व तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुप्ता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जागतिक लोकसंख्या दिनानिमीत्त जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करुन तेरा वर्षापासून राज्यामध्ये "जागतिक लोकसंख्या दिन” साजरा करण्यात येत आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारण टाळण्यासाठी मर्यादित नसुन माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टिनेही महत्वाचा आहे. कुटुंब नियोजनाच्या सेवाच्या
अनुपलब्धतेमुळे वाढणा-या अनावश्यक गर्भधारना, माता मृत्यु तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे देखील महत्वाचे आहे.क्रेद शासनाच्या मार्गदर्शक सुचना नुसार 11 जुलै हा एक दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. सदर लोकसंख्या दिनाचे घोष वाक्य "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात करु संकल्प कुटुंब नियोजनास बनवू आनंदाचा विकल्प " असुन लोकसंख्या दिन पहिला टप्पा दांपत्य संपर्क पंधरवडा दि. 27 जुन 2023 ते दि. 10 जुलै 2023 या कालावधी मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रामाचे महत्व पटवुन देण्या करिता समाजात जनजागृती व संवेदिकरण करण्यात येणार आहे आणि दुसरा टप्पा लोकसंख्या स्थिरीकरण पंधरवडा दि. 11 जुलै ते 24 जुलै 2023 या कालावधीत प्रत्यक्ष कुटुंब नियोजनाच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत.
जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून आज भारतापुढे अनेक आव्हाने निर्माण होऊ शकतात. याकरीता कुटंब नियोजनाच्या पध्दतीचा वापर करुन लोकसंख्या नियंत्रण करण्यामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी केले आहे.
******