निवडणूकीच्या तोंडावर सर्व पक्ष एकत्र येऊन बी आर एस विरोधात निवडणूक लढवतील - मा.आ. शंकर आण्णा धोंडगे
परंडा शहरात शेकडो कार्यकर्त्यांचा बी आर एस मध्ये प्रवेश
परंडा : भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्यायाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तसेच मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा समन्वयक रामजिवंन बोदर व यांच्या मार्गदर्शनाखाली पंरडा, भूम, वाशी, येथील शेकडो युवकांनी भारत राष्ट्र समिती ( बी आर एस ) पक्षात प्रवेश केला आहे.
परंडा शहरातील संरगम मंगल कार्यालय या ठिकाणी माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये परंडा शहरातील गुरुदास कांबळे व कालुभाई सौदागर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी भाषणात म्हणाले तेलंगणा प्रमाणेच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन भारत राष्ट्र समिती सध्या राज्यामध्ये काम करत आहे. 75 वर्षात सर्व पक्षांनी महाराष्ट्रात सत्ता भोगली मात्र कोणत्याही प्रकारची महाराष्ट्रातील समस्या पूर्णपणे दूर झालेली नाही. आतापर्यंत जनतेसमोर कोणताही पर्याय नसल्याने जनतेने सहन केलेले आहे. आता जनतेसमोर तेलंगणा सरकारचे मॉडेल उभे आहे नक्कीच महाराष्ट्रातील सर्व जनता भारत राष्ट्र समितीला येणाऱ्या निवडणुकीत पाठबळ देईल. तीन महिन्या पासून आमच्या पक्षाने महाराष्ट्रात काम करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी बी आर एसला बी टीम सी टीम आहे असे अपप्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख के सी आर यांनी पंढरपूरच्या सभेमध्ये विरोधकांना त्यांचे उत्तर दिले आहे. सगळ्या पक्षांना भीती निर्माण झाली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी तेलंगणात राबविलेल्या 440 योजना महाराष्ट्रात सत्ता आल्यास दोन वर्षात पूर्ण करून दाखवण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे सर्व पक्षांची पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे ते निवडणूकीच्या तोंडावर सर्व पक्ष एकत्र येऊन बी आर एस विरोधात निवडणूक लढवतील असे देखील मत यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना
मा.आ.धोंडगे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी अक्षय शिंदे, राहुल वाघमारे, उत्तम गोरे, अविनाश टेकाळे, अभिषेक गायकवाड, प्रशांत कडबणे, करण भोसले, नितीन कच्चे, सचिन कच्चे, सुनील सल्ले, रमेश सल्ले, लक्ष्मण सल्ले, जीवन सावंत, संतोष गोंधळी, शिवाजी भोई अजय त्रिंबके किरण ओमकार कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
यावेळी जेष्ठ नेते प्रा. मारुती कारकर ,अॅड. रुपेश माळजे, अॅड.विश्वजीत शिंदे , ज्ञानेश कामतीकर, गौस मुलानी, फलंचंद गायकवाड, संजय भिसे, संतोष राठोड, शिवाजी काळे, प्रवीण पडवळ, गणेश शिंदे, प्रशांत गुंजाळ, पांडुरंग तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.