नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे काम वाखाणण्याजोगे.. त्यांना आरोग्य सुरक्षा किट मिळणे गरजेचे - सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे
उस्मानाबाद :-
सध्या पावसाळा सुरु असुन त्यातच भुयारी गटार मार्गाचे काम चालु असुन रस्ते नाल्याची दुरावस्था झाली आहे, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे, पावसाच्या पाण्याला व नागरिकांच्या सांडपाण्याला वाटच नसल्याने ठिकठिकाणी घाण पाणी साठुन दुर्गंधी पसरत आहे,या परिस्थितीत नागरिक नगर परिषद मुख्याधिकारी मॅडम व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना फोन करून तर लेखी निवेदन देऊन गैरसोय दुर करण्यासाठी धाव घेत आहेत,स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी हे सफाई कामगारांना घेऊन या परिस्थितीला सामोरे जात स्वच्छता करुन होणा-या गैरसोयी दुर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,अगदी गाळ,घाण दुर्गंधीला बाजुला सारत,पावसात भिजत हे सफाई कामगार कर्तव्य पार पाडत आहेत या सफाई कामगारांचे अशा वेळी कौतुकास्पद काम असुन त्यांचे आभार मानले पाहिजेत.सतत नगर परिषदेच्या कामावर नाराजी व्यक्त केली जाते परंतु सध्याच्या त्यांच्या कामगिरीवर शहरवासियांनी समाधान व्यक्त केले पाहिजेच.आश्चर्याची बाब म्हणजे एका एका ठिकाणी तर कामगारांना नालीच्या आरपार जाऊन अडकलेल्या दगड मातीत घाणीचे थर काढावे लागतात..गरज राहिल वास्तवतेची..त्यांच्या ही आरोग्याचा प्रश्न गंभीर असुन त्यांना सुरक्षा किट असणे गरजेचे आहे..सफाई कामगारांना अपेक्षित सुविधा देण्यासाठी विचार होणे हे देखील महत्वाचे आहे..असे मत व्यक्त करुन नगर परिषद स्वच्छता विभागातील अधिकारी,कर्मचारी,सफाई कामगार यांचे आभार, धन्यवाद सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी मानले आहे.