राज्यात चालु असलेल्या कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षक भरती सह सुशिक्षित बेरोजगारांचाही विचार करण्यात यावा, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
उस्मानाबाद :- राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असल्याने कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षक भरती विस हजार रुपये वेतनावर भरती प्रक्रिया सुरू आहे,वयोमर्यादा ७०वर्षे ठेवली आहे.शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने तात्पुरती व्यवस्था सरकारने केली याबद्दल शासनाचे अभिनंदन आहे परंतु या कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षक भरती बाबत असे अनेक डिएड,बिएड,बिपीएड,
ग्रॅज्युएट,झालेले बेरोजगार युवक युवती आहेत की त्यांना जगण्यासाठी रोजगाराची संधी मिळाली पाहिले,मराठी भाषा फाऊण्डेशन वर्ग उर्दु शाळेतील भाषा तासिका तत्त्वावर शिकविणारे मानसेवी शिक्षक त्यांच्या नियम अटी शिथिल करून त्यांना पुर्ण वेळ सामावुन मानधनात वाढ केली पाहिजे,शिक्षण विभागातील व इतर विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,आजच्या काळात वेगाने वाढत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर होत असतांना विद्यार्थ्यांना योग्य असे शिक्षण,मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात कुठल्याही जिल्हा परिषदेच्या शाळेतील सेमी इंग्रजी शिक्षण रद्द करण्यात आले नाही परंतु एकमेव उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सेमी इंग्रजी शिक्षण रद्द केले आहे आणि ही बाब शहरीच नव्हे तर ग्रामिण भागातील गोर गरीब सर्व सामान्य विद्यार्थ्यांवरील सर्वात मोठा झालेला अन्याय होय,प्रत्येक घटकातील विद्यार्थी मुलांना शिक्षण चांगल्या दर्जाचे मिळाले पाहिजे आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार..कंत्राटी पद्धतीने भरली जात असणारी सेवानिवृत्त शिक्षक भरती बाबत सुशिक्षित बेरोजगारांचाही विचार करून रोजगाराची संधी देण्यासाठी प्रयत्नशील सहकार्य करावे अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे आरडिसी महेंद्र कांबळे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले,निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे, उपशहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश नन्नवरे,सह अन्य इतर उपस्थित होते.