उस्मानाबाद शहरात दोन ठिकाणी व उमरगा येथे जुगार विरोधी कारवाई
आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.12.07.2023 रोजी 20.35 वा. सु. आनंदनगर पोठा हद्दीत येथे लोकमंगल बॅकेसमोर उस्मानाबाद येथे छापा टाकला आरोपी नामे- नबीलाल साहेबलाल मुजावर वय 49 वर्षे, रा. मळेगाव, ता. बाशी, जि. सोलापूर हे लेाकमंगल बॅकेसमोर उस्मानाबाद येथे मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 450 ₹ रोख रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.12.07.2023 रोजी 16.30 वा. सु. उमरगा पोठा हद्दीत बलसुर येथे छापा टाकला आरोपी नामे- 1)अमजद मगशीब अत्तार वय 35 वर्षे, रा. बलसुर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद 2)बब्रुवान पाटील, रा. लातुर हे दोघे तोहरसाब अत्तार यांचे पत्राचे शेडसमोर मोकळ्या जागेत बलसुर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 13,190 ₹ रोख रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद शहर पोलीसांनी दि.12.07.2023 रोजी 18.40 ते 18.55 वा. सु. उस्मानाबाद शहर पोठा हद्दीत 2 छापे टाकले 1)सांजा गावात जाणारे रोडलगत इंदिरानगर येथे छापा टाकला आरोपी नामे- पाशा जिलानी तांबोळी वय 38 वर्षे, रा. खाजा नगर ग.नं. 3, उस्मानाबाद हे सांजा गावात जाणारे रोडलगत इंदीरानगर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,020 ₹ रोख रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले, तर 2) तुळजापूर नाका उस्मानाबाद येथे छापा टाकला असता आरोपी नामे- सुभाष नवनाथ माने, वय 40 वर्षे, रा. साठेनगर, उस्मानाबाद हे तुळजापूर जाणारे रोड वरती राज ईलेक्ट्रीकचे समोर तुळजापूर नाका उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 9,200 ₹ रोख रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.