शासन आपल्या दारी १५ जुलैला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ५२२ पदांसाठी होणार निवड

0


Osmanabad news  ,दि,11):- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांना नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांच्या संयुक्त वतीने 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील 15 नामांकित उद्योजक सहभागी होणार आहे.यामध्ये 522 पदांसाठी पात्र व इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे.
 या मेळाव्यात 10 वी पास/ नापास,बारावी, आयटीआय/पदवी/ पदव्युत्तर,पदविका,अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रिलेशनशिप मॅनेजर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, सर्टिफाईड इंटरनेट कन्सल्टंट, एमबीए एच आर/फायनान्स/मार्केटिंग प्रोफेशनल/ सॉफ्टवेअर इंजिनिअर,अकाउंटंट, ऑपरेटर,जॉब ट्रेनी,फील्ड ऑपरेटर, वाहन चालक,ऑफिस बॉय,मदतनीस आणि आयटीआयमधील सर्व ट्रेडस अशाप्रकारच्या अनेक संधी रोजगार मेळाव्यातून उपलब्ध होणार आहे.
तरी या मेळाव्यात जिल्ह्यातील नोकरी व रोजगार इच्छुक उमेदवारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी (02472) 299434 या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव व उस्मानाबादच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top