जीवन जगण्यासाठी आवश्यक बाबी द्या किंवा मरण्याची परवानगी द्या - जिल्हाधिकारी यांना निवेदन
उस्मानाबाद : एका घटनेतील पोलिसांनी संशयित आरोपी केलेल्या भिमा गोविंद शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी द्या किंवा सह कुटुंब मरण्याची परवानगी देण्याचे निवेदन 21 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
परंडा येथील 2010 मधील एका घटनेमध्ये पोलिसांनी भिमा गोविंद शिंदे आरोपीत केले होते. कोर्टाने 2/9/2022 रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. या घडलेल्या घटनेमध्ये मानसिक शारीरिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतडी, लिव्हर, किडनी वर परिणाम झाले व आनेक आजार झाले आहेत त्यामुळे जीवन जगण्यासाठी आवश्यक बाबी द्या किंवा मरण्याची परवानगी द्या अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे भिमा गोविंद शिंदे यांनी केली आहे.