डॉ. प्रतापसिंह पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता
उस्मानाबाद : महाराष्ट्र मध्ये अचानक अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले व राज्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले. उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा देत अजित पवार गटामध्ये प्रवेश केला व जिल्ह्यातील अनेक जण एकनिष्ठ राहून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले व त्यानंतर उस्मानाबाद शहरांमध्ये अजित पवार गटाची बैठक कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला व अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी देखील निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाची सध्या जिल्हाभरामध्ये चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसा पूर्वी जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अनेक जणांची मुलाखत दिल्याची माहिती आहे त्यामध्येच डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉक्टर प्रताप सिंह पाटील यांचा जिल्हाभर दांडगा संपर्क असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य आहे तसेच दोन हात पुढे करत अनेकांना मदत करण्याची संधी देखील ते सोडत नाहीत त्यामुळे सध्या उस्मानाबाद जिल्ह्याचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ.प्रतापसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांना चालणारा व्यक्तिमत्व म्हणून जिल्हाध्यक्ष पदाचे चेहरा ठरू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक चांगला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सामान्य नागरिक, युवक, उद्योजक, विद्यार्थी, पत्रकार व राजकारणी अशा सर्वच क्षेत्रातील लोकांशी त्यांचा नजीकचा संबंध आहे. या गोष्टीचा फायदा त्यांना व पक्षाला देखील होऊ शकतो. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावरती जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असून तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर उस्मानाबाद शहरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तसेच पत्रकार परिषद देखील होणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा शरद पवार यांची बीड येथे सभा होणार आहे त्याच्या अनुषंगाने मराठवाडाभर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येत आहे. आज आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये निवड जाहीर करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.