१३,१४ व १५ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान उत्स्फूर्त पणे राबवावा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

0



१३,१४व १५ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान उत्स्फूर्तपणे राबवावा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे नागरिकांना आवाहन

 

·   सूर्योदय ते सूर्यास्त दरम्यान करता येईल ध्वजारोहण

 

        उस्मानाबाद,दि.12( osmanabadnews ):भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने 'हर घर तिरंगा' हे अभियान उस्मानाबाद जिल्हयात दि. 13 ऑगस्ट 2023, दि. 14 ऑगस्ट, 2023 आणि दि. 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे राबवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

            उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 13,14 आणि 15 ऑगस्ट या  तीन दिवसांच्या कालावधीत  आपल्या घरावर राष्ट्रध्वज यथोचित सन्मानाने फडकाविण्यात यावा. राष्ट्रध्वज सन्मानाने फडकाविताना राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी. तसेच राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.सूर्योदय ते सूर्यास्त दरम्यानध्वजारोहण करता येईल.असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

           उपरोक्तप्रमाणे 'हर घर तिरंगा' हे अभियान प्रत्येक शासकीय कार्यालयात अनिवार्यपणे राबविण्यात यावे. याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्था, खाजगी संस्था, महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पितळे, सार्वजनिक आस्थापना तसेच खाजगी आस्थापनांची कार्यालये, कारखाने व दुकाने इत्यादी ठिकाणी 'हर घर तिरंगा' हे अभियान उत्स्फूर्तपणे राबवावा असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top