बार्शी : तालुक्यातील दहिटणे गावात या दोन आजींनी हात करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या ताफा थांबवला. इथून जाणार आहेत हे समजताच या दोघीजणी पावसात अर्धाएक तास वाट पाहत थांबल्या होत्या...
ताफा थांबताच त्या अगदी लगबगीने गाडीजवळ आल्या. युवराज संभाजीराजे छत्रपती गाडीतून उतरताच गालावरून हात फिरवला आणि फक्त इतकंच म्हणाल्या, "शिवाजी राजाच्या घरातलं लेकरू येणार हाय त्यला तरी बघता येईल !"
हे शब्द ऐकून युवराज संभाजीराजे छत्रपती निशब्द झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजही सर्वसामान्यांच्या मनावर असलेलं गारुड आणि छत्रपती घराण्याबद्दल ह्रदयात असलेली पवित्र भावना पाहून मनात प्रचंड उर्जा निर्माण झाली. अशी प्रतिक्रिया युवराज संभाजीराजे छत्रपती फेसबुक पेज वर दिली आहे.
आपल्याकडूनही लोक राष्ट्रहिताची, सर्वसामान्यांच्या भल्याची अपेक्षा करतात याची जाणीव आणखी स्पष्ट झाली. माझ्या महान पूर्वजांनी केलेल्या महान कार्याची अनुभूती पदोपदी अशा प्रसंगांतून येत राहते आणि तो उज्ज्वल वारसा जपण्याची प्रेरणा व पुढे चालविण्याची ऊर्जा मिळत राहते...