प्रमोद वाघमारे यांनी निवेदनात म्हटले आहे की,हे सर्व 800 ते 850 पोलीस अधिकारी सध्या संभ्रमात असून त्यांची द्विधा मनस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. कारण पदोन्नतीच्या नंतर त्यांची जिल्हा व विभाग बदली होत असते, त्यामुळे त्यांच्या मुलांचा प्रवेश शाळा व कॉलेजमध्ये नेमका घ्यायचा की नाही किंवा कोठे घ्यायचा या संधर्भात त्यांना ठोस निर्णय घेता येत नसल्यामुळे त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे हे सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे गृहखात्यावर नाराज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे
तसे पाहिले असता महसूल खात्यामध्ये किंवा इतर क्षेत्रातील सरकारी खात्यांमध्ये अधिकाऱ्यांची बदली व पदोन्नती नियमाप्रमाणे वेळेवर केली जाते , परंतु शासकीय नोकरदार वर्गात फक्त पोलीस खात्यामध्येच ही शोकांतिका दिसून येते की , या खात्यामध्ये ना कोणी व्यवस्थित लक्ष देतो , ना वेळेवर पदोन्नती होते , ना वेळेवर बदली होते , येथे फक्त तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो
त्यामुळे मा.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनच्या या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दोन वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणारे अधिकारी यांची तात्काळ पदोन्नती करावी असे प्रमोद वाघमारे यांनी म्हटले आहे
यावेळी निवेदन देताना शुभम कदम , इम्तियाज शेख , विजय साळुंके , शंकर राठोड , उमेश राठोड यांची उपस्थिती होती