टायगर ग्रुप जिल्हा संपर्कप्रमुखाची गाडी जाळली; गुन्हा नोंदवूनही आरोपीला अटक नाही! अटकेच्या मागणीसाठी भूम येथे रास्तारोको आंदोलनाचा इशारा

0



उस्मानाबाद / osmanabadnews :-
टायगर ग्रुपचे जिल्हा संपर्कप्रमुख राजभाऊ माने यांची भूम येथे एका गॅरेजसमोर उभी केलेली स्कार्पिओ गाडी अज्ञात व्यक्तीनी जाळून टाकल्याची घटना घडली आहे. याप्रकरणात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदविल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करावी अन्यथा 10 ऑगस्ट रोजी भूम येथील गोलाई चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष तुषार शिंदे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

निवेदनात म्हटले की, टायगर ग्रुपचे जिल्हा संपर्कप्रमुख राजभाऊ माने यांची एमएच 14 - सीबी 8283 या क्रमांकाची स्कार्पिओ गाडी 18 जुलै 2023 रोजी भूम येथील विश्रामगृहाजवळील अलमप्रभू मोटार गॅरेजसमोर दुरूस्तीसाठी उभी केलेली होती. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही गाडी अज्ञात व्यक्तीनी जाळून टाकली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर 19 जुलै रोजी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. परंतु अद्याप आरोपीस अटक झालेली नाही. त्यामुळे 8 ऑगस्टपर्यंत तपास करून आरोपीविरूद्ध कारवाई न झाल्यास 10 ऑगस्ट रोजी भूम येथील गोलाई चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष तुषार शिंदे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top