उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी अवैध मद्य विरोधी पोलिसांची कारवाई
Osmanabadnews :
तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) अमोल भारत घोडके, वय 38 वर्षे, रा. कणे गल्ली तुळजापूर ता.तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि 31.07.2023 रोजी 21.45 वा. सु. तुळजापूर ते काक्रंबा बायपास जाणारे रोडवरील चौकाजवळील हॉटेल देवराज कामत चे लगत अंदाजे 2,250 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 45 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) इस्मालजी अशोक तेलंग, वय 37 वर्षे, रा. तुंगत ता. पंढरपुर जि. सोलापूर ह.मु.खडकवाडी वस्ती पिंपळा बु. ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि 01.08.2023 रोजी 18.00 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,000 ₹ किंमतीची सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे-यशोदा कालीदास काळे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद या याच दिवशी 19.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 800₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तामलवाडी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) आदित्य आनंत माने वय 20 वर्षे, रा. विजय चौक उसृमानाबाद ता. जि. उस्मानाबाद या दि 01.08.2023 रोजी 18.30 वा. सु. हनुमान चौक बार्शी रोड हॉटेल सागर फॅमिली रेस्टॉरंट समोर मोकह्या जागेत उस्मानाबाद येथे अंदाजे 2,235 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे- 2) प्रविण चंद्रकांत पवार, वय 35 वर्षे रा. वडागर गल्ली उस्मानाबाद हे याच दिवशी 20.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक वडार गल्ली समोर मोकळ्या जागेत उसृमानाबाद येथे अंदाजे 1,700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उस्मानाबाद शहर पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)विठ्ठल अर्जुन कोरडे, वय 35 वर्षे, रा. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद या दि 01.08.2023 रोजी 20.30 वा. सु. सरमकुंडी शिवारातील हॉटेल प्रशांत येथे अंदाजे 2,260 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये वाशी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.