लहूरत्न सामाजिक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबवीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा
उस्मानाबाद :- osmanabadnews :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी लहूरत्न सामाजिक संघटना यांच्या वतीने उस्मानाबाद शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भारत विद्यालय येथे SSC मार्च -2023 बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
लहूरत्न सामाजिक संघटना यांच्या वतीने विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या वेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. संस्थेचे खजिनदार शितोळे बापू, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिंगारे आप्पा ,भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. ए.कांबळे सर व संघटनेचे अध्यक्ष मिलिंद आप्पा पेठे व प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षीरसागर सर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व आभार प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी मानले.
तसेच लुहुरत्न सामाजिक संघटनेच्या वतीने वैराग नाका येथून भव्य दिव्य मिरवणूक देखील करण्यात आली होती.