भारत राष्ट्र समिती पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे परंडा शहरात उद्घाटन, युवकांच्या प्रवेश
परंडा : दि . 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन भारत राष्ट्र समीतीच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी बोंदर यांनी बऱ्याच युवक कार्यकर्त्यांना BRS पार्टी मध्ये प्रवेश दिला उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदशन करताना त्यांनी सांगीतले कि
नुकतेच BRS पार्टी मध्ये प्रवेश घेतले ले तरुण तडपदार युवक कार्यकर्ते गुरुदास कांबळे यांनी या संपर्क कार्यालयासाठी जागा उपलब्द करुण दिली आहे .परंडा तालुक्यातील नागरीकांना सतत त्यांच्याशी संपर्क करता यावा व BRS पार्टीच्या माध्यमातुन त्यांच्या समस्या
सोडवता याव्यात यासाठी पार्टीच्या कार्यालयाची निर्मीती केली आहे. असे बोंदर यांनी सांगीतले आगामी स्थानीक स्वराज्यच्या निवडनुका BRS पार्टी स्वबळावर लडवनार आसुन आमचा प्रमुख अजेंडा तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगना राज्यात राबवलेल्या कल्याण कारी सर्व योजना जशास तशा महाराष्ट्रात राबवीने हा राहील तरी परंडा तालुक्यातील सर्व कार्यकत्यांनी पायाला भींग्री बांधून कामाला लागावे व तेलंगाना राज्यात राबवलेल्या योजना तांडा , वस्ती , वाड्या , गावागावात , शहरात जाऊन आपण सांगाव्यात व महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांवण्यासाठी पर्यत्न करावेत . असे भावनीक आवाहन उपस्थीत कार्यकत्यांना बोंदर यांनी केले .
संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा.मारुती कारकर जिल्हा उप समन्वयक , विधानसभा प्रमुख गुरुदास कांबळे , नवनाथ जाधवर , अँड खोत पाटील , अँड भाउसाहेब मुंढे , आशोक कारकर , आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.