उस्मानाबाद : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जामखेड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित पवार हे १३ आॅगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्हा दौर्यावर येत आहेत. मी घेवून येतोय साहेबांचा संदेश, लढा विचारांचा राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाचा , असे या दौर्याचे निमित्त आहे. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
आ. रोहित पवार हे मराठवाड्याच्या दौर्याची सुरवात १३ आगस्ट रोजी सकाळी ९ वाजता तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शनाने करत आहेत. देवी दर्शनानंतर ते उस्मानाबाद शहराकडे आगमन करतील. सकाळी १० वाजता राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पार्टीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील कार्यालयात पत्रकार परिषद, त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता जिल्हा व तालुका पदाधिकाºयांची बैठक दुध संघाशेजारील रायगड हॉल येथे होणार आहे. या बैठकीत ते मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता बीडकडे प्रयाण करतील, तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, तसेच सर्व फ्रंटल सेलचे जिल्हा, तालुका व शहरचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.