जेसीबी चोरी करणारा आरोपी शिराढोण पोलीसांच्या ताब्यात
Osmanabadnews :
शिराढोण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- विठ्ठल आत्माराम सौदागर, वय 37 वर्षे, रा. गोविंदपूर, ता. कळंब जि. उस्मानाबाद यांचे दि. 08.08.2023 रोजी सायंकाळी 07.00 वा. सु. ते दि. 09.08.2023 रोजी 00.50 दत्तात्रय पेट्रोलियम गोविंदपूर येथुन अंदाजे 24,00,000 ₹ किंमतीचे जेसीबी क्र एमएच 45 एफ 9818 पिवळ्या रंगाची ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विठ्ठल सौदागर यांनी दि.11.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे गुरनं 132/2023 कलम- 379 भा. दं. वि. सं अन्वये नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री. नेहरकर पोलीस नाईक/ 1431 गादेकर, पोलीस अमंलदार 234/ मरलापल्ले, 1440/ गवळी, 1755 देशमाने यांचे पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घागरवाडा, ता. धारुर, जि. बीड येथील- जालिंदर गोविंद खाडे, वय 23 वर्षे, यास दि. 11.08.2023 रोजी घागरवाडा येथुन ताब्यात घेउन गुन्ह्यात चोरी गेलेला माल, जेसीबी जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.