उस्मानाबाद शहरात मटका जुगार विरोधी कारवाई , अनेक वेळा कारवाई मात्र मुख्य सूत्रधार मोकाट!
Osmanabadnews:
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद शहर पोलीसांनी दि.11.08.2023 रोजी 11.30 ते 18.20 वा. सु. उस्मानाबाद पो.ठा. हद्दीत 5 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे -1) दाउद कचरु पठाण, वय 27 वर्षे, रा.भारत विद्यालय जवळ खाजानगर ता. जि. उस्मानाबाद, तर 2) इरशाद आयुब शेख, वय 31 वर्षे, रा. खर्डा, ता.कळंब ह.मु. फकीरानगर उस्मानाबाद तर आरोपी नामे-3) मैनु मदार तांबोळी, वय 35 वर्षे, रा. ताजमहाल टॉकीजचे पाठीमागे उसमनाबाइ, तर 4) शकील कासीम तांबोळी, वय 57 वर्षे, रा. सांजावेस गल्ली उस्मानाबाद, तर आरोपी नामे 2) राजु आमनाथ परधीवय 30 वर्षे, रा. झोरेगल्ली उस्मानाबाद हे सर्वजन उस्मानाबाद येथे वेगवेगळ्या 5 ठिकाणी कल्याण मटका, मिलन डे मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 2,295 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उस्मानाबाद शहर पोठा येथे स्वतंत्र 5गुन्हे नोंदवले आहेत. अशी माहिती उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे.
उस्मानाबाद शहरात अनेक वेळा मटक्या या जुगारावर कारवाई होते मात्र मुख्य सूत्रधार मोकाट असल्याने घरात पुन्हा मटका नावाचा जुगार चालू होतो व गोरगरिबांचे संसार उघड्यावर येते. मुख्य सूत्रधार यांना नेमका पाठीशी कोण घालत आहे असा देखील प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.