कळंब येथील बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घोडके यांचे आवाहन
कळंब-
महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पक्षाची व्याप्ती वाढवून जनसेवेचा वसा पुढे नेण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करावे. युवा कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारून देशाचे नेते खा.शरद पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचववेत असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित जिल्हा युवा संवाद दौर्यानिमित्त कळंब येथे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष घोडके यांनी युवकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन केले.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीधर बाबा भवर, माजी उपसभापती गुणवंत पवार, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे, युवक प्रदेश सचिव शंतनू खंदारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदवीधर जिल्हाध्यक्ष रणजित वरपे, युवक नेते रणवीर इंगळे, अमर मडके, दत्ता चोरघडे, औदुंबर धोंगडे, भीमा हगारे, संदीप मोरे, किरण खोसे, अतुल धुमाळ, सलमान पठाण, मारुती शिंपले, विठ्ठल कोकाटे, श्रीकांत मिटकरी, शंभूराजे कोकीळ, आफताब तांबोळी, स्वप्नील चिलवंत यांच्यासह कळंब शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करून, खाजगी संस्थांकडून विद्यार्थांची आर्थिक लूट थांबवा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कामे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून आयोगाचे सक्षमीकरण करावे, नोकरभरतीसाठी नेमलेल्या खाजगी संस्थांची नेमणूक रद्द करून विद्यार्थांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्या वतीने कळंब उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.