Ahamadanagara : दि.३: (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्र उपचारासाठी प्रसिध्द असलेल्या अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा लेसर प्रणालीवर आधारीत सर्वात आधुनिक ‘काँटयुरा व्हिजन’ तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून या तंत्रज्ञानामुळे केवळ चष्म्याचा नंबर कायमचा जात नाही तर चष्म्यापेक्षाही चांगली दृष्टी देणे आता शक्य झाले आहे. डॉ. कांकरिया यांचे चष्मा नको असणार्यांसाठी वर्धापनदिनानिमित्ताने ” दृष्टी भेट योजने” अंतर्गत सवलतीच्या दरात भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर दि.१९ व २० ऑगस्ट२०२३ पर्यंत, साई सूर्य नेत्रसेवा, माणिक चौक, अहमदनगर येथे आयोजित केले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतागुुंतीच्या दृष्टी समस्येवर व चष्म्याचा नंबर आता पूर्णपणे घालवता येत असून चाळीशी नंतरही आता चष्म्याचा नंबर घालवता येणार आहे व काही लहान मुलांच्या दृष्टी समस्येवर ही आता उपचार करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे केरेटोकोनस या आजारावर आता यशस्वी उपचार करता येणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे अतिशय लहानपणी दृष्टीदोष व मोठे चष्म्याचे नंबर लागण्याचे प्रमाण मोठया गतीने वाढत असून हा एक मोठा चिंतेचा विषय झाला आहे. पूर्वी संपूर्ण शाळेत ४-५ जणांवर चष्मा असायचा त्यांना कंदील म्हणून चिडवायचे आता प्रत्येक वर्गात १०-१५ कंदील कंदील झाले आहेत. ह्या पुढील आयुष्यात सैन्यात जाणे, पोलिस भरती, पायलट होणे, नेव्ही, एम पी एस सी, यु पी एस सी स्पर्धा परिक्षा, रेल्वे व अनेक जॉबसाठी नकार दिला जातो. त्याचप्रमाणे अभिनय करणे, मॉडेलिंग, चित्रपट व दूरदर्शन मालिका विविध प्रकाराचे खेळ खेळणे ह्या साठीही अडचणी येतात ३-४ नंबर पेक्षा जास्त नंबर असलेल्या व्यक्तींना लंगडयाला ज्याप्रमाणे कुबडी शिवाय चालता येत नाही त्याच प्रमाणे चष्म्याविना अपंगत्व आल्या प्रमाणे वाटते.
या शिबीरात डॉ. प्रकाश कांकरिया चष्मा नको असणाऱ्या सर्व रूग्णांच्या तपासण्या करणार असून या शिबीरासाठी नांवनोंदणी आवश्यक आहे. असे संपर्क अधिकारी श्री आर टी केदार यांनी कळविले आहे व इच्छुकांनी अधिक माहितीसाठी हेल्पलाईन मो. ९११२२८८६११ किंवा ८८८८९८२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.