पूल पुण्याचा पण पाट्या कोणाच्या? ट्वीटवर रंगला श्रेयवाद सुप्रिया सुळे यांच्या ट्वीट ला भाजचे उत्तर
पुणे :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौक च्या पुलाचे आणि खेड मंचर येथील रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण झाले. पण श्रेयवादावरून आता ह्या कामाचे राजकारण होऊ लागले आहे एकीकडे भाजप माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराजी दर्शविली होती. एकीकडे राष्ट्रवादी खा. सुप्रिया सुळे ताई गटाच्या खासदार यांनी एक ट्वीट केले आहे त्यात ते म्हणतात की पुणे शहरातील चांदणी चौक येथील वाहतूक आजपासून सुरळीत होत आहे. येथील कामांचे आज लोकार्पण होत आहे, याचे समाधान आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या खात्याचे मंत्री नितीनजी गडकरी यांनी वारंवार या कामाबाबत वैयक्तिक लक्ष घालून ते मार्गी लावण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कामावरील मजूर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी यांनी देखील अहोरात्र काम करुन हे काम पुर्णत्वास नेले. याशिवाय या काळात नागरीकांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली त्यांनी जे सहकार्य केले ते खुप महत्वाचे आहे, याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार!
हे ट्वीट असे दर्शविते की राष्ट्रवादीच्या पाटपुराव्यामुळे हे काम झाले आहे
पण काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले होते तेव्हा पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांना हा मुद्दा सांगितला होता आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी हे ह्या मुद्याला घेऊन अनेक वेळा प्रयत्न केले होते.
त्यांनी ह्या संपूर्ण लोकार्पण सोहळ्यावरून नाराजीची पोस्ट ही समाज माध्यमांवर टाकली आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री लोकार्पण झाल्यावर त्यांच्या घरी ही गेले. पण समाज माध्यमांवर श्रेयवाद राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सुरु झाला सुप्रिया सुळे यांच्या ट्वीट ला उत्तर देत देवशीष कुलकर्णी यांनी म्हंटले आहे की चांदणी चौकातील कामाची संकल्पना व त्याचा पाठपुरावा केला - भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी ताईंनी.
संकल्पनेच्या मागे भक्कमपणे उभे राहिले - महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी नेहमीप्रमाणे हे अद्वितीय कार्य करुन दाखवले - विकासपुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे कार्य शेवटपर्यंत व्यवस्थितपणे होण्यासाठी लक्ष घातले - पुण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील दादांनी या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरद पवार गटाचा काय संबंध?
अशी खोचक टीका राष्ट्रवादी ताई गटावर करण्यात आली आहे…
त्यामुळे नेमके हे श्रेय कोणाचे ह्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे