भैरवनाथ आय.टी.आय चे पहिल्याच वर्षी घवघवीत यश, चारही ट्रेडचा १०० % निकाल
कळंब - गेल्याच वर्षी चालू झालेल्या महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व डी. जी.ई.टी संलग्नित शहरातील ढोकी रोडवरील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आय टी आय ) पहिल्याच वर्षीचा इलेक्ट्रिशियन, वायरमन,कोपा व वेल्डर्स या चारही ट्रेडचा १०० % निकाल लागला आहे.
इलेक्ट्रिशियनमधून आशिष आवाड ९२.८३%,गोविंद वावरे ८८.५० %,अमर काळे ८८.००% वायरमनमधून श्रीकांत धाकतोडे ८९.३३%, प्रीतम हिंगे ८४.५० %,आदित्य गाडे ८२.६७%, सुमित खंडागळे ८२.६७% वेल्डर कोर्समधून- सोनी भांडे ७८.६७%, तुकाराम मिरगणे ७७.३३%,प्रतापसिंह मुंडे ७६.००% तर
कोपामधून अभिषेक कळेकर ८६.६७%, उत्कर्ष गरड ८३.००%, राणी काळे ८२.६७%,अंकिता सुरवसे ८२.६७% या सर्व यशस्वी व प्रशिक्षण संस्थेतील गुणवंत प्रशिक्षणार्थींचे धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने, आयटीआयचे प्राचार्य सूरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक सागर पालके,निदेशक विनोद जाधव,प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,क्रीडाशिक्षक प्रा.संग्राम मोहिते,आदित्य गायकवाड, विनोद कसबे,प्रा.मोहिनी शिंदे,ग्रंथपाल प्रगती धाराव आदींनी अभिनंदन केले आहे.