उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत

0

उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत

उस्मानाबाद ( Osmanabad news ) जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस (Heavy Rain) झालेला नाही. उस्मानाबाद तालुक्यातील अनेक परिसरात पाऊस नसल्याने सोयाबीन पिकांनी माना टाकायला सुरुवात झाली आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय, या चिंतेने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. 

जिल्ह्यात अद्यापही शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाहिजे तसा जोरदार पाऊस झालेला नसल्याने नद्यांना पहिला पूरसुद्धा आलेला नाही. अशातच सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली असून त्यातच पाऊस गायब असल्याने अनेकपिके कोमेजून जाऊ लागली आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यातील बहुतांश भाग तहानलेला असून सुरवातीच्या पावसावरच शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. मात्र आता मध्यंतरी काही दिवस रिमझिमशिवाय दमदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे. दमदार पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून पुढील काही दिवस राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. आठ दिवसात जर उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही तर अनेक सोयाबीनला लागलेली फुले गळून पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दिसून येऊ लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top