पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा शिवसेना तालुकाप्रमुख लाकाळ यांच्याकडून सत्कार
उस्मानाबाद : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील आरोग्यसेवा मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांना पाच लाखापर्यंतचा रूग्णालयातील खर्च मोफत होणार आहे. या निर्णयाबद्दल शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ-पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत पुणे येथे सत्कार केला.
राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील सेवा निःशुल्क
करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. यासाठी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी आग्रह धरला आहे. सरकारी रुग्णालयातील या सर्व तपासण्या, चाचण्या निःशुल्क करण्याची घोषणा आरोग्यमंत्री सावंत यांनी केली होती. नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेना उस्मानाबाद तालुका अजित लाकाळ-पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांचा पुणे येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत उपस्थित होते.