google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अनाधिकृत व्यक्तींकडून वजन काटे खरेदी न करण्याचे आवाहन

अनाधिकृत व्यक्तींकडून वजन काटे खरेदी न करण्याचे आवाहन

0


उस्मानाबाद,दि.28( osmanabad news ) : गुजरात राज्याकडून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात व कररहीत स्वरुपात महाराष्ट्र राज्यात विकले जात आहेत. त्यामुळे स्थानिक वजन काटे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांचे नुकसान होत आहे. विशेष बाब म्हणजे यामुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल सुध्दा बुडत आहे. अशी तक्रार प्राप्त झाली असल्याचे महाराष्ट्र राज्याचे वैध मापनशास्त्र नियंत्रक यांनी कळविले आहे.
           तसेच चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांचीसुध्दा कमी दरात महाराष्ट्र राज्यात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या वजन काट्यांना राज्य शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. वजन काटे अप्रमाणित असल्याने ग्राहकहितास हानी होत आहे. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टिकर लावून त्यांची अनाधिकृत विक्री करत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूलावर परिणाम होत आहे.
           तरी जिल्ह्यातील सर्व वजन काटे उपयोगकर्त्यांनी अशा प्रकारच्या अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करु नयेत असे आवाहन लातूर व उस्मानाबाद जिल्हा वैध मापन शास्त्राचे उपनियंत्रक स.या.अभंगे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top