उस्मानाबाद,दि.28( osmanabad news ) : जिल्ह्यातील अनेक पारधी समाजाच्या लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. तसेच जिल्ह्यातील भिल्ल, अंध, मसनजोगी, गारोडी, घिसाडी, कुडमुडे जोशी आदी (अनुसूचित जाती/भटक्या विमुक्त जमाती) त्यांच्याकडे 1950 पुर्वीचा कोणताही महसूली पुरावा नाही. त्यामुळे जातींचे प्रमाणपत्र देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वस्तुस्थिती विचारात घेवून संपूर्ण जिल्ह्यात पारधी समाजाच्या व अनुसूचित जमाती/ विमुक्त भटक्या जमातीच्या नागरिकांना मोहिम स्वरुपात जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मतदार नोंदणी, आधार नोंदणी (आधार अद्ययावतीकरण), संजय गांधी योजनेचा लाभ व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून तालुकानिहाय दोन टप्प्यामध्ये शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
त्या-त्या तालुक्यातील वरील समाजाच्या पात्र लाभार्थ्यांनी शिबीरास उपस्थित राहून त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या कागदपत्रे घेवून उपस्थित राहावे व वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यातील तालुकानिहाय शिबीराचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. भूम तालुका-28 ऑगस्ट रोजी भूम (आठवडी बाजार), 29 ऑगस्ट रोजी माणकेश्वर (महादेव मंदिर हॉल), 30 ऑगस्ट रोजी आष्टा (गोलेगाव पारधी वस्ती), 31 ऑगस्ट रोजी वालवड (महादेव मंदिर), 4 सप्टेंबर रोजी पाथरुड (जि.प.शाळा), 5 सप्टेंबर रोजी ईट (सिध्देश्वर मंदिर) आणि 6 सप्टेंबर रोजी आंबी (तित्रज मारुती मंदिर), परंडा तालुका- 29 ऑगस्ट रोजी पिस्तमवाडी, 1 सप्टेंबर रोजी मुगाव (कौडगाव), 4 सप्टेंबर रोजी आनाळा, 5 सप्टेंबर रोजी शिराळा, 6 सप्टेंबर रोजी सिरसाव, 7 सप्टेंबर रोजी लाखी, 8 सप्टेंबर रोजी परंडा, वाशी तालुका- 30 ऑगस्ट रोजी पारा, 31 ऑगस्ट रोजी वाशी, 1 सप्टेंबर रोजी पारगाव, तुळजापूर तालुका- 30 ऑगस्ट रोजी हंगरगा तुळ, 5 सप्टेंबर रोजी नळदुर्ग, 7 सप्टेंबर रोजी सावरगाव, 8 सप्टेंबर रोजी इटकळ, 12 सप्टेंबर रोजी तुळजापूर, उमरगा तालुका- 5 सप्टेंबर रोजी उमरगा येथील चिंचोळे मंगल कार्यालय, 7 सप्टेंबर रोजी बिरुदेव मंदिर, लोहारा तालुका- 31 ऑगस्ट रोजी जेवळी, 8 सप्टेंबर रोजी लोहारा येथील महसूल हॉल तहसिल कार्यालय, उस्मानाबाद तालुका- 4 सप्टेंबर रोजी कसबे तडवळा आणि सांजा गाव, 5 सप्टेंबर रोजी ढोकी तेरणा हायस्कूल, पापनास नगर उस्मानाबाद, तेर येथील संत गोरोबा काका मंदिर सभागृह, बावी (आश्रमशाळा), जागजी (ग्रामपंचायत कार्यालय), समुद्रवाणी (विठ्ठल रुक्मीणी मंदिर), अंबेजवळगा (मारुती मंदिर), करजखेडा (खंडोबा मंदिर), 6 सप्टेंबर रोजी पसळप (जिल्हा परिषद हायस्कूल), बेंबळी (वेलकम मंगल कार्यालय), 7 सप्टेंबर रोजी येडशी (प्रियदर्शनी सभागृह), बुकनवाडी (हनुमान मंदिर), 8 सप्टेंबर रोजी उपळा (ग्रामपंचायत सभागृह), 11 सप्टेंबर रोजी गावसूद (विठ्ठल रुक्मिणी मंदिर), कळंब तालुका- 29 ऑगस्ट रोजी अंदोरा (ग्रामपंचायत सभागृह), 31 ऑगस्ट रोजी मोहा (सरकारी दवाखान्यासमोरील समाज मंदिर) आणि 5 सप्टेंबर रोजी ईटकूर (ग्रामपंचायत सभागृह) याप्रमाणे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
****