अवैध गुटखा विक्री करणाऱ्याकर अन्न औषध प्रशासनाची कारवाई , उस्मानाबाद शहरात खुलेआम गुटखा विक्रीवर कधी होणार कारवाई?
उस्मानाबाद :- अन्न औषध प्रशासनाने एक मोठी गुटख्याविरुद्ध कारवाई केली आहे यामध्ये दहा लाख पंधरा हजार सहाशे रुपये किमतीचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याचप्रमाणे उस्मानाबाद शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. शहरातील अनेक मुख्य भागांमध्ये गुटक्यांची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात आहे. अन्न औषध प्रशासनाने शहरातील होलसेल गुटखा विक्रेत्यावर कारवाई करावी अशी शहरातील नागरिकांतून मागणी होत आहे.
जिल्ह्यातील
तामलवाडी पोलीस ठाणे : वार्ड नं 2 तिडक पोस्ट बामणी सडक अर्जुनी गोंदिया येथील- खुमेंद्र हरीश्चंद्र, वय 28 वर्षे, हे दि. 12.09.2023 रोजी 10.30 वा. सु. तामलवाडी टोलनाका येथे तंबाखुचे 104 पाउच, विमल पान मसाला 104 पाउच सह वाहन क्र एमएच 14 एके 9872 असा एकुण 10,15,600 रु किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखुचे, विमल पान मसाला गोवा गुटख्या सह वाहन विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेले आढळले. तसेच लोकसेवकाचे आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन नसरीन तनवीर मुजावर, वय 44 वर्षे, व्यवसाय- अन्न व औषध प्रशासन विभाग उस्मानाबाद यांनी प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द दि. 12.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द. वि. सं. कलम- 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम 26(2)(i), 26 (2)(iv) व 27(2) (3) सह वाचन क 30(2) व दंडनिय क. 59 अंतर्गत उस्मानाबाद शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती उस्मानाबाद पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.