google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

0



उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई


कळंब पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)पुनम सुरेश शिंदे, रा. दाळींब मा. उमवाकडी पिढी, ता. कळंब जि. उस्मानाबाद या दि.13.09.2023 रोजी16.39 वा. सु. गावातील आपल्या राहात्या घराचे बाजूलावाकडी येथ्ज्ञे वाकडी ते ईटकुर जाणारे शहाजी काळे यांचे शेताजवळ अंदाजे 5,000 ₹ किंमतीचे 100 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायन द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे 2)राणी शंकर काळे, वय 37 वर्षे, रा. शेरे गल्ली कळंब ता. कळंब जि. उस्मानाबाद या दि.13.09.2023 रोजी 18.20 वा. सु. देवी रोड शेरे गल्ली कळंब येथे अंदाजे 10,000 ₹ किंमतीचे 200 लि. गावठी दारु  निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायन द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. 3)पोपट गणा चव्हाण, वय 56 वर्षे, रा. डिकसळ ता. कळंब जि. उस्मानाबाद हे दि.13.09.2023 रोजी 18.00 वा. सु. आपल्या पत्रयाचे शेडचे समोर डिकसळ येथे अंदाजे 900 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आली. 4)रुपाली विजय पवार, वय 23 वर्षे, रा. जुनी दुध डेअरी जवळ डिकसळ ता. कळंब जि. उस्मानाबाद हे दि.13.09.2023 रोजी 18.45 वा. सु. जुनी दुधडेअरी डिकसळ जवळील पारधी वस्तीवर आपल्या राहात्या घरा समोर अंदाजे 3,600 ₹ किंमतीचे 90 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायन द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदविले आहेत.

मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)संजय हनुमंत जमादार, वय 40 वर्षे, रा. कोथळी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे दि.13.09.2023 रोजी 19.50 वा. सु. बस स्थानक चौकात स्वस्त धान्य सोसायटी जवळील चहाचे हॉटेल जवळ कोथळी येथे अंदाजे 3,300 ₹ किंमतीची 15 लि.गावठी दारु व एम.एल.कर्नाटकी दारुचे 45 कागदी पॉकीटे अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

आनंदनगर पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)बब्रु गुलाब काळे,वय 70 वर्षे, रा. रामनगर सांजा ता. जि. उस्मानाबाद हे दि.13.09.2023 रोजी 17.15 वा. सु. रामनगर सांजा ता.जि. उस्मानाबाद येथे अंदाजे 2,800 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

तामलवाडी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)अक्षय भागवत वाघमारे, वय 28 वर्षे, रा. पांगरधरवाडी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि.13.09.2023 रोजी 16.00 वा. सु. पांगरधरवाडी येथे आपल्या राहात्या घराजवळ येथे अंदाजे 800 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

                                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top