एकाच ठिकाणी साडेबारा लाखांचा गुटखा , ग्रामीण पोलिसांच्या कारवाई नंतर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0



एकाच ठिकाणी साडेबारा लाखांचा गुटखा , ग्रामीण पोलिसांच्या कारवाई नंतर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एका कारवाई नंतर गुटखा आला कुठून! पहिल्या कारवाईवर संशय?

उस्मानाबाद शहरात खुलेआम गुटखा विक्री पाठबळ कोणाचे?

Osmanabadnews :  उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी अंबेजवळगा येथे ३० आगस्ट रोजी कारवाई केली कारवाई झाल्यानंतर नंतर त्याच ठिकाणी तीन दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली व गुटखा सापडला त्यामुळे पहिल्यादा कारवाई केलेल्या ग्रामीण पोलिसांच्या कारवाईवर संशय निर्माण झाला आहे. त्याचं प्रमाणे उस्मानाबाद शहरात खुलेआम गुटखा विक्री होते आहे. उस्मानाबाद शहरात अनेकदा कारवाई करण्यात येते मात्र मुख्य सूत्रधार होलसेल गुटखा विक्री करणारे सापळत नाहीत पोलीस कारवाई होणार हि माहिती होलसेल गुटखा विक्री करणारांना देतं कोण? पोलिसातील गुटखा विक्रेत्यांचे गुप्त माहितीदार कोण? उस्मानाबाद शहरात खुलेआम गुटखा विक्री कधी बंद होणार? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होते आहे. गुटखा खुलेआम विक्री होते असल्याने शाळेतील विद्यार्थी देखील गुटखा खाण्यास सुरुवात केली आहे. काही भ्रष्ट पोलिसांच्या मुळे येणाऱ्या युवा पिढीला यांचे परिणाम भोगावे लागणार आहेत.



अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांची कारवाई


दि.30.08.2023 रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण, जि. उस्मानाबाद च्या पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा असा एकुण 7,50,734 ₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

     सदर प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 30.08.2023 रोजी 15.15 वा. सु. उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. गायकवाड यांना अंबेजवळगा येथील माळवस्ती मध्ये एक इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे, अशी गोपनिय बातमी मिळाली त्या बातमीच्या आधारे उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांच्या पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन छापा कारवाई केली असता. नमुद इसम नामे विशाल हनुमंत पवार, रा.अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद हा पोलीसांची चाहुल लागताच पळून गेला. पथकाने सदर घराची पाहणी केली. त्यामध्ये एकुण 7 पोते प्रत्येक पोत्यात 385 पुडे लाल गोवा 1000 किंमत अंदाजे 1,34,750 ₹, 2 पोत्यामध्ये 120 पुडे हिरवा गोवा 1000 किंमत अंदाजे 42,000₹, 24 पोत्यामध्ये 2400 पुडे हिरा पान मसाला किंमत अंदाजे 2,88,000₹, 46 पोत्यामध्ये महा रेयॉल 717 तंबाखुचे 9200 पुडे किंमत अंदाजे 2,76,000₹  एका पोतृयात जाफरानी जर्दा एक्स एल 1 कंपनीचे 208 पुडे किंमत अंदाजे 9,984₹,  असा एकुण 7,50,734 ₹ किंमतीचा सुग्रधीत सुपारी, गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी घरा मध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारा इसम नामे विशाल हनुमंत पवार, रा.अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद  याचेविरुध्द दि.31.08.2023 रोजी उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. येथे गुरंन 261/2023, भा.दं.वि. सं. कलम- 328, 272, 273, 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  श्री. नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी- श्री.गायकवाड, सपोनि श्री. नेटके, पोलीस हावलदार/303 भिमराव ढगे, पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण यांच्या पथकाने केली.

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


स्थानिक गुन्हे शाखा-  दि.02.09.2023 रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जि. उस्मानाबाद च्या पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा असा एकुण 5,36,000 ₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

     सदर प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 02.09.2023 रोजी 22.10 स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. यशवंत जाधव यांना अंबेजवळगा येथील माळवस्ती मध्ये तीन इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे, अशी गोपनिय बातमी मिळाली त्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन छापा कारवाई केली असता. नमुद इसम नामे 1) आबासाहेब बाबुशा नन्वरे, 2) विशाल हनुमंत पवार, 3) किरण उर्फ कृष्णा जाधव रा.अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद हे तिघे पोलीसांची चाहुल लागताच पळून गेले. तसेच पथकाने आबासाहेब नन्वरे यांचे शेतात पत्रयाचे शेडमध्ये जावून पाहणी केली. त्यामध्ये एकुण पोते क्र 1 ते 31 मध्ये  हिरा पान मसालाचे पाऊच मिळून आले प्रत्येक पोत्यामध्ये 100 पाऊच, असे एकुण 3100 पाऊच, पोते क्र 32 ते 37 मध्ये पाहणी करता आतमध्ये गुटख्याचे 420 पाऊच सह एक होन्डां शाईन मोटरसायकल असा एकुण 5,36,000 ₹ किंमतीचा सुगंधीत पान मसाला, गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पत्रयाचे शेड मध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारे इसम नामे 1) आबासाहेब ननवरे, 2) विशाल हनुमंत पवार, 3) किरण उर्फ कृष्णा जाधव रा. अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद याचेविरुध्द दि.03.09.2023 रोजी उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. येथे गुरंन 265/2023, भा.दं.वि. सं. कलम- 328, 272, 273, 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  श्री. नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी- श्री. यशवंत जाधव, सपोनि श्री. मनोज निलंगेकर, पोलीस हावलदार/हुसेन सय्यद ,अमोल चव्हाण, बबन जाधवर, बलदेव ठाकुर, चालक पोलीस हावलदार/100 मस्के यांच्या पथकाने केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top