जिल्हा बंद!, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, उस्मानाबाद जिल्हा हा शांतता प्रिय असून, याची शांतता भंग होता कामा नये. करिता आपण सर्व मराठा बांधवांनी शांततेचा मार्ग अवलंबवावा पोलिस प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे. आपल्याकडून आज उस्मानाबाद जिल्हा बंद आवाहनामध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे , जीवित अथवा वित्त हानी होता कामा नये. याची सकल मराठा बांधवांनी दखल घ्यावी व आपला जिल्हा शांतता प्रिय आहे. हे सर्वांना दाखवून द्यावे ही विनंती धन्यवाद असे आवाहन अतुल कुलकर्णी.
मा.पोलिस अधिक्षक
उस्मानाबाद यांनी केले आहे.