शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ईलेक्ट्रीक मोटार चोरीचा अखेर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : अनेक दिवसापासून जुन्या जिल्हा रुग्णालय/ नवीन वैद्यकीय महाविद्यालयातील येथील
अंतररुग्ण विभागातील लिप्टमधील दोन ईलेक्ट्रीक मोटार नसल्याने लिफ्ट बंद आहेत. याबाबत विचारणा केली असता मोटार चोरी गेल्याची माहिती देण्यात आली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. गुन्हा दाखल होण्यास विलंब का झाला 24 तास वरदळ असणारा ठिकाणाहून इलेक्ट्रिक मोटर चोरी कशा गेल्या
असे अनेक मुद्दे नागरिकांतून उपस्थित होत आहेत.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : दि.28.08.2023 रोजी 10.00 वा. पुर्वी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथील अंतररुग्ण विभागातील लिप्टमधील दोन ईलेक्ट्रीक मोटार किंमत अंदाजे 20,000₹ व आठ ड्राय बॅटऱ्या किंमत अंदाजे 3,200 ₹ असे एकुण 23,200₹ चा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी रामराव पागोजी जंगले, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी विज तंत्री रा. मेडीकल कॉलेज परिसर उस्मानाबाद यांनी दि.04.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.