राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या भूम परंडा वाशी विधानसभा उपाध्यक्षपदी भाऊसाहेब मुंडे यांची निवड.
धाराशिव उस्मानाबाद : ( दि.3 ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव (उस्मानाबाद) येथे भुम परंडा वाशी विधानसभा उपाध्यक्ष पदी भाऊसाहेब भगवान मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भूम परंडा वाशीचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांच्या हस्ते भूम परंडा वाशी च्या विधानसभा उपाध्यक्षपदी भाऊसाहेब भगवान मुंडे यांची निवड करण्यात आली. या नियुक्त वेळी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गाव पातळीवर संघटना बांधणी करून आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट करीन असा विश्वास धुरगुडे यांनी व्यक्त केला.
यावेळी भूम-परंडा-वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुलजी जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, केशेगावं शिंदेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच बालाजी शिंदे,समाधान मुंडे, बाबासाहेब मुंडे, गणेश जाधवर, तात्याबा मुंडे, ॲड.शुभम पालके, निलेश मुंडे, सतीश मिस्किन, कैलास झिरपे, अण्णासाहेब मुंडे, अमोल मुंडे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.