google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 होळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जंयतीचा सांगता समारोप सोहळा संपन्न

होळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जंयतीचा सांगता समारोप सोहळा संपन्न

0


होळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जंयतीचा सांगता समारोप सोहळा संपन्न


उमरगा /लोहारा तालुक्यातील होळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जंयतीचा सांगता समारोप सोहळा संपन्न झाला. 

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचे हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते किरणजी गायकवाड प्रमुख वक्ते म्हणून दिलीप गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड, बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, कॉंग्रेसचे अनु. जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय सरवदे, संजय कांबळे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर बनसोडे, नितीन शिंदे, दलित महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, युवा सेनेचे विधानसभा अध्यक्ष शरद पवार, शिवाजी दुनगे, सिताराम कांबळे, माजी सभापती निलंगा गंगाताई कांबळे, श्रीरंग सरवदे, नगरसेवक दिपक रोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गावातील मराठा समाज बांधवांचा सामाजिक क्षेत्रात बहुमुल्य  योगदान देऊन उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्ल "दलित मित्र" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 35 महिलांना सावित्रीच्या लेकी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव यांनी केले तर प्रास्ताविक प्रा सुखदेव होळीकर यांनी केले. यावेळी प्रदीप मोरे , व्यंकट माळी, संजय मनाळे,शंकर मोरे, करण बाबळसुरे ,मुरली पवार, अनिल गायकवाड , बालेपिर शेख, रामभाऊ जाधव ,ओम बिराजदार ,गणेश पाटील, दत्ता गायकवाड, पवन मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष जालिंदर पाटोळे, कृष्णा सरवदे, मारुती शिंदे, बालाजी शिंदे, संदीप पाटोळे, ईदुकर शिंदे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top