जिल्हा पोलीस दल, जिल्हा परिषद व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने वरंवटी, परिसरात भव्य वृक्षारोपन

0



जिल्हा पोलीस दल, जिल्हा परिषद व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने वरंवटी, परिसरात भव्य वृक्षारोपन 

उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग असुन वन राईचे प्रमाण कमी आहे. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात रुजू झाल्यापासून वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. या संकल्पातुन त्यांनी आज पावेतो वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. 09.09.2023 रोजी जिल्हा पोलीस दल, जिल्हा परिषद व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव टेकडी परिसर वरंवटी, डोंगरमाळावर येथे 2,000 वृक्ष लागवड करण्यात आली. त्यामध्ये वड, पिंपळ, लिंब, चिंच, सिताफल, गुलमोहर, पांगीरा, बांबू, बदाम,आंबा अशा स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात आली.

       सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी श्री. सचिन ओम्बासे, हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यावेळी वृक्ष लागवड करण्यात आली.  यावेळी बोलताना  उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक, मा. श्री. अतुल कुलकर्णी, यांनी वंरवंटी परिसर हा नयन रम्य ठिकाण असुन भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून विकशीत होवू शकते. या ठिकाणी विविध प्रजातीची 20,000 झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे असे सागिंतले.

       सदर कार्यक्रमास जिल्हा अधिकारी श्री. सचिन ओम्बासे, उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक, मा. श्री. अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता श्री. नितीन भोसले, आर्ट ऑफ लिव्हिंग उस्मानाबाद चे स्वंयसेवक, उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातील विविध अधिकारी व अमंलदार, श्री. रविशंकर  शाळेचे विद्यार्थी तसेच वरवंटी, येथील गावातील स्थानिक ग्रामस्थ यांनी वृक्ष लागवड अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोदंविला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top