नगर परिषदेच्या कर्मचारी (लिपिक) शामा अनभुले-लोमटे यांची अशी भूतदया !

0

नगर परिषदेच्या कर्मचारी (लिपिक) शामा अनभुले-लोमटे यांची अशी भूतदया !

उस्मानाबाद - धाराशिव डी.१० (प्रतिनिधी)
मुक्या प्राण्यांना देखील मनुष्यासारख्याच गरजा आहेत. यामध्ये अन्न, पाणी व निवारा याचा प्रामुख्याने समावेश होतो. न पाळलेले परंतू पाळीवसारखे असलेले नगर परिषदेच्या परिसरात वावर करणारे एक कुत्रे आहे. ते अन्नासाठी इतरत्र भटकंती करून पुन्हा नगर परिषदेच्या मोकळ्या छताखाली येऊन अलगदपणे विसावते. परंतू तो कोणालाही भूंकत नाही किंवा अंगावर धावून जात नाही. त्यामुळे चावण्याचा प्रश्न तर खूप दूरच. दुपारच्या जेवणासाठी नगर परिषदचे कर्मचारी टेबलावर जेवण करतात. मात्र या कुत्र्यासाठी कोणीही एक घास भरण्यासाठी पुढे येत नाही. ही बाब पाहून मानवता जागृत असलेल्या या नगर परिषदेमधील जन्म मृत्यू विवाह नोंदणी विभाग मधील लिपिक शामा आर. अनभुले - लोमटे यांचे मन हेलावून गेले. त्यामुळे त्या ऑफिसला येताना दररोज न चुकता या कुत्र्यासाठी बिस्कीट चा पुडा घेऊन येतात. तो त्याला लहान बाळासारखे खाऊ घालतात. तो कुत्रा देखील आपल्या परिवारातला सदस्य आहे असे समजूनच आणलेला तो पुडा आनंदाने ग्रहण करतो हे विशेष. त्यामुळे खऱ्या अर्थाने भूतदया काय असते, ती का, कशी व कशासाठी करावी ? याची प्रचिती इतर कर्मचाऱ्यांसह येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात सहजपणे येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top