जुगार विरोधी जिल्ह्यात चार ठिकाणी कारवाई , गुन्हे दाखल

0



जुगार विरोधी  जिल्ह्यात चार ठिकाणी कारवाई , गुन्हे दाखल 

उस्मानाबाद -धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.28.10.2023 रोजी 11.20 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा. हद्दीत लहुजी चौक धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)किरण राजेंद्र पेठे वय 32 वर्षे, रा. लहुजी चौक नागनाथ रोड,  धाराशिव ता. जि. धाराशिव हे लहुजी चौक धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 435 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.28.10.2023 रोजी 12.30 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत करजखेडा चौकात ग्रामपंचायत चे पाठीमागे खंडोबा मंदीरा समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)राजु शाहुराज कांबळे वय 29 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव हे करजखेडा चौकात ग्रामपंचायत चे पाठीमागे खंडोबा मंदीरा समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 740 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

 

 

तामलवाडी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि.28.10.2023 रोजी 18.00 वा. सु. तामलवाडी पो. ठा. हद्दीत तामलवाडी गावातील उड्डानपुलाचे बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)ऐजाज बाबुलाल काटीकर, वय 45 वर्षे, रा. तामलवाडी गावातील उड्डानपुलाचे बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 560 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.28.10.2023 रोजी 14.40 वा. सु. ढोकी पो. ठा. हद्दीत पेट्रोल पंप चौक ढोकी येथे बस स्थानकच्या बाजूला छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)राजेंद्र दादाराव ढवारे, वय 62 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव हे पेट्रोपंप चौक ढोकी येथे बस स्थानक च्या बाजूला कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 470 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top