उस्मानाबाद -धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरी, जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरुच!
परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- अजहर युसुफ सय्यद, वय 33 वर्षे, रा. खासापुरी चौक, परंडा, ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 06,10,2023 रोजी 10.30 ते 14.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 72 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 10 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण 3,06,750 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अजित जाधव यांनी दि.06.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे गुरनं 236/2023 भा.दं.वि.सं. कलम- 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तापासा दरम्यान परंडा पोलीस ठाण्याचे पथकाने सशंईत आरोपी साहिल मुस्तफा पठाण, वय 19 वर्षे रा नरसिंह नगर, परंडा यास ताब्यात घेवून त्याचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता नमुद आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यावर परंडा पोलीसांनी नमुद आरोपी सह चोरीस गेलेला माल ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करत आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अमित तानाजी तांबे, वय 42 वर्षे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. पंचायत समितीच्या पाठीमागे तुळजापूर जि. धाराशिव यांचे बहिणीचे नावावर असलेल्या गट नं 07 कसई शिवार येथील रुपापेट्रोलियम पंपाचे डिझेल टाकीतुन अंदाजे 1,67,877 ₹ किंमतीचे 1803 लि. डिझेल हे दि. 05.10.2023 रोजी 24.00 ते दि. 06.10.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अमित तांबे यांनी दि.06.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-गणेश नागोराव साठे, वय 48 वर्षे,रा. माकणी, ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची स्प्लेंडर पल्स मोटरसायकल क्र एमएच 25 एस 4226 ही दि.22.09.2023 रोजी 14.30 ते 18.30 वा. सु. सास्तुर ते लोहारा जाणारे रोडलगत अज्ञात व्यक्तीने चेरुन नेली. अशा मजकुराच्या गणेश साठे यांनी दि.06.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बालाजी रावसाहेब पाटील, वय 45 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिवयांचे राहाते घरासमोर माडज येथे बांधलेली एक म्हैस अंदाज 45,000₹ किंमतीची ही दि.10.09.2023 रोजी 21.00 ते दि. 11.09.2023 रोजी 00.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बालाजी पाटील यांनी दि.06.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मुकेशकुमार बन्सीलाल जाट, वय 24 वर्षे, रा. भिलवाडा ता.जि. भिलवाडा हे त्यांचे मालकीचा ट्रक ही राज्यस्थान येथुन बेंगलोर येथे दि.25.09.2023 रोजी 05.30 वा. सु. हायवे रोड चोरखळी कारखाना रोडवरुन जात होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रक मधील अंदाजे 1,49,530 ₹ किंमतीचे 3 बंडल मध्ये असलेले कपडे, 5 बंडल व बॉक्स मध्ये स्वयंपाकासाठी लागणारे भांडे चोरुन नेले. अशा मजकुराच्या बालाजी पाटील यांनी दि.06.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.