खेड ग्रामपंचायत कार्यालय तालुका लोहारा सरपंच उपसरपंचासह चार सदस्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अपात्र
लोहारा तालुक्यातील खेड येथील ग्रामपंचायत च्या सरपंच,उपसरपंच सह चार सदस्य जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबसे यांच्या आदेशाने अपात्र ठरले आहेत.
रमाबाई बाबासाहेब गायकवाड यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ब अन्वये सचिन सुरेश जाधव अर्चना अविनाश राठोड अब्दुल हमीद शेख राजश्री रमाकांत कांबळे जया दिलीप कांबळे शरविन शेख यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती अर्जदार रमाबाई बाबासाहेब गायकवाड यांच्यातर्फे विधीज्ञ दत्तात्रय घोडके यांनी युक्तिवाद केला सदर ग्रामपंचायत कार्यालयाचे संबंधित सरपंच उपसरपंच तसेच चार इतर सदस्य यांनी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या विहित नमुन्यांमध्ये तसेच पद्धतीने निवडणुकीचा खर्च केलेला नाही त्यामुळे त्यांना अपात्र करावे अशी विनंती केलेली होती. जिल्हाधिकारी यांनी विधीज्ञ दत्तात्रय घोडके तुळजापूर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून वरील ग्रामपंचायतचे चार सदस्य सरपंच व उपसरपंच यांना अपात्र करण्याचा निर्णय १०नोव्हेंबर २०२३ दिला तसेच सदर निर्णयाच्या दिनांक पासून पाच वर्षाच्या कालावधी करिता संबंधित यांना निवडणूक लढविण्यास देखील अपात्र केलेले आहेत
अर्जदार रमाबाई बाबासाहेब गायकवाड यांच्या वतीने विधिज्ञ दत्तात्रय घोडके तुळजापूर यांनी व्यक्तिवाद केला. जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्य व सरपंच अपात्र होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे सदर ग्रामपंचायत वरती सध्या प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे