30 नोव्हेंबरपासून पशु वंध्यत्व निवारण शिबीर 19 डिसेंबरपर्यंत शिबीरांचे आयोजन
धाराशिव- उस्मानाबाद ,दि.23( ): जिल्ह्यातील पशुपालकांकडील भाकड व वंध्यत्व पशुधनावर उपचार करुन ते उत्पादनात आणण्यासाठी जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपासून पशु वंध्यत्व निवारण शिबीरे घेण्यात येणार आहे. या शिबीराचे 19 डिसेंबरपर्यंत मोहिम स्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे.
पशुपालकांकडील भाकड व वंध्यत्व जनावरांना उत्पादनात आणण्यासाठी वंध्यत्व निवारण शिबीराच्या आयोजनाच्या सूचना शासनाने दिल्या आहे.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखाना,तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय यांच्या कार्यक्षेत्रात पशु वंध्यत्व निवारण शिबीराचे मोहिम स्वरुपात आयोजन करण्यात आले आहे.
भाकड जनावरांना उपचाराअंती उत्पादनात आणण्याच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व संस्था प्रमुखांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिले आहेत.
*****