google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या प्रयत्नाने मिळाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा चार कुटुंबांना लाभ

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या प्रयत्नाने मिळाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा चार कुटुंबांना लाभ

0
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या प्रयत्नाने मिळाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा चार कुटुंबांना लाभ.


उस्मानाबाद:धाराशिव :- 
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या प्रयत्नाने शाळेमध्ये शिकत असताना मयत झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना चा लाभ मिळवून दिला.

      चार कुटुंबातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला व त्यादरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.  त्याचबरोबर त्यांना आर्थिक मदतही केली. मौजे अपसिंगा ता.तुळजापूर येथील संजय सुवर्णकार यांचा मुलगा इयत्ता दुसरी मध्ये शिकत होता. त्या मुलाला आणि वडील संजय यांना सर्प दंश झाला होता त्यांच्यावर उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले मात्र मुलगा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावला होता व वडील संजय यांची प्रकृती अतिशय गंभीर होती व ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते व त्यांना मुलगा मयत झाला हे माहिती नव्हते.त्यावेळी महेंद्र काका धुरगुडे यांनी तेथील हॉस्पिटल मधील डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वरती योग्य आणि त्वरित उपचार करावे अशी विनंती केली. मुलगा शिकत असलेल्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाशी सानुग्रह अनुदान योजनेबद्दल माहिती सांगितली व सर्व कागदपत्रे त्यांनी जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे दाखल केली.

      त्याचप्रमाणे दुसरी घटना ही  (कदमवाडी) सांगवी काटी येथील होती.दोन कुटुंब हे  पंढरपूरला वारीसाठी जात असताना कुंडी सोलापूर येथे  ट्रॅक्टर ला अपघात झाला व त्यात या कुटुंबातील शिकत असणारी दोन्ही मुले अपघातामध्ये मृत्यू पावली. त्यामधील एक मुलगा सातवी व दुसरा आठवीच्या वर्गामध्ये शिकत होता. या दोन्ही कुटुंबाला जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी स्वतः मदत केली व शासनाच्या वतीने आपण मदत मिळवून देऊ असे या कुटुंबीयांना आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने सांगितले . व त्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी  जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना फोनवरून घटनेची माहिती सांगितली व या योजनेची कागदपत्रे मुख्याध्यापकांना सोबत घेऊन दाखल करण्यात आली.

मौजे आरळी खुर्द या गावातील राम मोहिते यांच्या मुलाचे हृदयविकाराचे ऑपरेशन झाले होते व तो मुलगा दोन महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता व घरी आल्यानंतर या मुलाचे निधन झाले. निधन झाल्या नंतर जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी राम मोहिते यांची राहत्या घरी जाऊन भेट घेतली. शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी या योजनेबद्दल संपर्क केला असता मुख्याध्यापक यांनी असे सांगितले की विद्यार्थ्यांचा मृत्यू हा हृदयविकाराचे ऑपरेशन झाल्याने झाला आहे त्यामुळे त्याला याचे अनुदान मिळू शकत नाही तेव्हा जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी असे सांगितले की तुम्ही कागद कागदपत्रे तरी गोळा करून माझ्याकडे द्या मी  राहिलेल्या कागदपत्राची पूर्तता करतो व अनुदान मिळवून देतो असे सांगितले व यांचेही या अनुदान योजनेसाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे कागदपत्रे स्वतः देऊन दाखल केले. व हे अनुदान मिळवून दिले.

    दिनांक 11 सप्टेंबर रोजी सुवर्णकार मोहनेश संजय इयत्ता दुसरी राहणार अपसिंगा ता.तुळजापूर निधी 75000, शिंदे सुमित सुधाकर इयत्ता सातवी रा. सांगवी काटी ता.तुळजापूर निधी 75000, साळुंखे ज्ञानेश्वर दत्तात्रय इयत्ता आठवी रा.सांगवी काटी ता.तुळजापूर 75000 निधी, ओमकार राम मोहिते इयत्ता पाचवी रा.आरळी खुर्द ता.तुळजापूर निधी 1 लाख 50  हजार अशी अनुक्रमे  मदत मिळाली.

   तीन कुटुंबाला प्रत्येकी 75 हजार रुपये एवढे अनुदान मदत  मिळाले आहे व एक कुटुंब यांना दीड लाख रुपये अनुदान मदत मिळाले आहे.  शासनाच्या नवीन जीआर नुसार या अनुदान योजनेची रक्कम 75 वरून दीड लाख झाली व या कुटुंबाला दीड लाख रुपये अनुदान मिळण्यास मदत झाली. या अनुदान योजनेचा लाभांशाचा चेक अपघातामध्ये मयत  झालेल्या  मुलाच्या आईच्या नावे बँकेमध्ये जमा केला जातो. व ते चेक आज त्या मयत मुलांच्या आई यांच्या नावे  त्यांना मिळाला आहे.

   पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष म्हणाले आज या कुटुंबाचे थोडे दुःख कमी झाले असेल परंतु कायमस्वरूपी त्यांच्या मनात हे दुःख राहणार आहे परंतु आज माझ्या प्रयत्नाने   या कुटुंबांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली. आपल्या बाकीच्या मुलांसाठी पुढील शिक्षण करण्यास नक्कीच मदत होईल. 

       राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा चेक या कुटुंबाला दिला यावेळी अपघातामध्ये मयत  झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले व त्यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धूरगुडे यांचे याबद्दल आभार मानले की आम्हाला मदत मिळवून दिली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

     राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राज्यशासनाकडून  सुरू करण्यात आली. ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे खेड्यापाड्यातील व शहरातील विद्यार्थी मोठ्याप्रमाणावर शिक्षणासाठी संबंधित संस्था किंवा शाळेमध्ये जातात; परंतु यादरम्यान एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत मिळावी हा आहे.

     पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे म्हणाले की जिल्हा मध्ये कुठेही अशी घटना झाली तर मला याबद्दल कळवा मी आपल्याला नक्कीच मदत करेल आपल्या सेवेसाठी मी 24 तास सदैव तत्पर असेल.मी एक पुढारी म्हणून काम न करता समाजाचा सेवक  म्हणून मी हे काम करीन. व शाळेचे मुख्याध्यापक पासून ते जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी अधिकारी यांचेही जिल्हाध्यक्ष यांनी केलेले सहकार्य व मदतीबद्दल आभार व्यक्त केले.

     यावेळी  सामाजिक न्याय चे जिल्हाध्यक्ष अतुलजी जगताप, माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मामा क्षीरसागर, केशेगाव शिंदेवाडी ची उपसरपंच बालाजी शिंदे, तीर्थ गावचे उपसरपंच विनोद जाधव, लिंबराज लोखंडे व अपघातामध्ये मयत  झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top