लातुर लोकसभा निरिक्षकपदी शंकरराव बोरकर यांची निवड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी 'होऊ द्या चर्चा' ही संकल्पना संपूर्ण राज्यात व्यापक स्वरुपात राबविण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात सखोल मार्गदर्शनही केले.व याठिकाणी शंकरराव बोरकर यांची लातुर लोकसभा मतदारसंघाच्या निरिक्षकपदी निवड करण्यात आली.तसेच आपण स्वतः लातूर लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त गावे व प्रभागांमध्ये 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमांचे नियोजन व निरिक्षण करावे. अधिकाधिक ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहून आव्हाल पक्षश्रेष्ठींना सादर करावा. असे नियुक्ती पत्रारात नमुद केले आहे.