एका वर्षात दोन वेळा नालीवरील स्लाब कोसळला , शहरात अभियंताला हाताला धरून निकृष्ट दर्जाची कामे?
उस्मानाबाद : शहरातील पोलिस लाईन येथील एसपी आफीस समोरील कोहिनूर हॉटेल कडे जाणारा रस्त्यावरील नाली वरील स्लॅप पुन्हा खराब झाला आहे. अगोदर दोन वेळा त्याचे काम झाले असून निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने नाली वरील स्लॅप खराब झाले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राट दारावर कारवाई न करता पुन्हा पुन्हा त्याच कंत्राट दाराकडून काम करून घेतले जात आहे. काम करणारा कंत्राटदाराचे निकष्ट दर्जाचे काम असल्याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
कामाच्या दर्जा तपासण्याचे काम अभियंता यांचे असते मात्र अभियंता कसल्याही प्रकारची तपासणी करत नसल्याचा प्रकार समोर आला आहे एका वर्षामध्ये दोन वेळा या नालीवरील स्लॅब चे काम झाले असून आणखीन तिसरा वेळी या नालीवर काम होणार आहे. याच प्रमाणे उस्मानाबाद शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. शहरात झालेली कामे इस्टिमेट प्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे होत नसल्याचे अनेक तक्रारी देखील नागरिकांनी करत असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. चिरीमिरी घेऊन निकष्ट कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामांना पाठबळ देणाऱ्या नगरपालिकेतील अभियंता सह निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या चालु वर्पात झालेला कामांची गुणवत्ता तपासणी व इस्टिमेट प्रमाणे कामे झाल्याची तपासणी , काम न करता नगरपालिकेतून बिले काढण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.