१ रुपयात पीकविम्या’चा ३५ लाख शेतकऱ्यांना फायदा! फडणवीसांची योजना ठरली बळीराजाला वरदान!

0

१ रुपयात पीकविम्या’चा ३५ लाख शेतकऱ्यांना फायदा! 
फडणवीसांची योजना ठरली बळीराजाला वरदान! 

मुंबई -  

१ रूपयात पीक वीमा या योजनेअंतर्गत २२ जिल्ह्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ही रक्कम अग्रिम आहे, अंतिम नाही. यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. 

देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री असताना त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. आज प्रत्यक्षात याची अमंलबजावणी होऊन शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय. १ रूपयात पीक वीमा योजनची मोठी चर्चा झाली होती. ही फक्त घोषणाच आहे अशा पद्धतीची टिकाही विरोधकांनी केली होती.

काय आहे योजना 

२०१६ च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा विमा हफ्ता राज्य सरकार भरत आहे. यासाठी वार्षिक ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जात होती. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमुळे  शेतकर्‍यांवर याचा आता कोणताच भार नाही. शेतकऱ्याला फक्त १ रुपये भरून पोर्टलवर नोंदणी करावी लागते.

पीक विमा भरताना लागणरी कागदपत्रे

अर्ज भरताना काळजीपूर्वक माहिती भरावी लागते.

 १ रूपयांत विमा मिळवण्यासाठी 
१) पीकपेरा स्वयं घोषणापत्र, 
२) सातबारावर उतारा, 
३) आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबूक, 
४) सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्र
अधिक माहितीसाठी शासनाच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top