विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासासाठीच मोबाईलचा वापर करावा-डॉ.प्रतापसिंह पाटील

0
विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासासाठीच मोबाईलचा वापर करावा-डॉ.प्रतापसिंह पाटील

कळंब-विद्यार्थ्यांनी विषयाचा सखोल अभ्यास करताना हातातील मोबाईल मधील माहिती,कौशल्य व तंत्रज्ञानाचा फक्त अभ्यासासाठीच वापर करून आपले भवितव्य उज्वल करावे असे प्रतिपादन डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले.ते
वेद शैक्षणिक संकुल येथे भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील नवागत विद्यार्थी स्वागत,गुणवंत विद्यार्थी सत्कार व पालक मेळावा प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव प्रा.संजय घुले व सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्रचार्या प्रा.डॉ.मिनाक्षी भवर,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने हे प्रमुख पाहुणे म्हणून होते.
पुढे बोलताना डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी मोबाईलचे फायदे व तोटे सांगत नवीन विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कौशल्य प्राप्त करावे आणि जीवनात यश मिळवावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्रीमधील प्रथम आशिष आवाड,द्वितीय गोविंद वावरे,तृतीय अमर काळे,तआरतंत्रई मधील प्रथम श्रीकांत धाकतोडे,द्वितीय प्रितम हिंगे,तृतीय आदित्य गाडे,वेल्डर प्रथम सोनी भांडे, द्वितीय तुकाराम मिरगणे,तृतीय प्रतापसिंह मुंडे तर कोपामधील प्रथम अभिषेक कळेकर,द्वितीय उत्कर्ष गरड, तृतीय राणी काळे,अंकिता सुरवसे व रूपाली सोनवणे या गुणवंत प्रशिक्षणार्थींचा तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या रण फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम विकास वावरे द्वितीय प्रितम हिंगे आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत पवार यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य सूरज भांडे व आभार निदेशिका कल्याणी भराटे यांनी मानले.
या कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे, निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक सागर पालके,निदेशक विनोद जाधव,निदेशिका कोमल मगर,लिपिक आदित्य गायकवाड, सेवक विनोद कसबे व ढमाले ताई यांच्यासह  पालक व सर्व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.

आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार केल्यास यश प्राप्त करणे अवघड नाही - प्रा.संजय घुले

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत जागरूक पालक व शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावून आपले कर्तव्य पार पाडावे.विद्यार्थी दशेत चौफेर विकास स्वतःचा करून घेतला तर आयुष्य सुखमय होते प्रा.डॉ.मिनाक्षी शिंदे- भवर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top