सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला रुग्णालयातील कर्मचा-यांचा सत्कार

0

सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला रुग्णालयातील कर्मचा-यांचा सत्कार

धाराशिव :- महिला दक्षता समितीच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,सिस्टर,मावशी,
गार्ड तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार शाल,पुष्पगुच्छ व भारतीय संविधान उद्देशिका प्रत आणि उद्देशिकातील व्याख्या अनुवाद प्रत देऊन करण्यात आला, कार्यकर्माची सुरुवात म.ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुन करण्यात आले.मान्यवरांनी आपापल्या शुभेच्छा मनोगतात आशाताई कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला,कोरोना काळातील बेडची कमतरता मुळे त्यांना आलेल्या अनुभवावरून त्यांनी त्यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात पाच बेड गादीसह भेट दिली तर रुग्ण कल्याण समितीच्या वतीने रक्तदात्यांना सन्मान ट्राॅफी उपक्रमात सहभागी झाल्या,बेवारस, मतीमंद व्यक्तीसाठीची धडपड,दिव्यांगासाठी कार्य अशा अनेक कार्यात सहभागी आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ईस्माईल मुल्ला,तर प्रमुख पाहुणे साहित्यिक तथा इतिहासकार युवराज नळे,विशेष अतिथी माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, यजमान चांद शेख,सदस्य,रुग्ण कल्याण समिती (ग), सामाजिक कार्यकर्ता तथा सदस्य नैतिकता समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवचे गणेश रानबा वाघमारे,ब्रदर शेख रौफ,जिल्हाध्यक्ष काॅग्रेस ओबीसीचे धनंजय राऊत, सरचिटणीस संजय गजधने, अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला,राहुल गायकवाड,आशिष लगाडे,तर महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ. स्मिताताई गवळी,डॉ मेटे,माधुरी बनसोडे, रुग्णालयातील डॉक्टर सिस्टर सह कर्मचारी व अन्य उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भंडारी मॅडम यांनी केले तर आभार आशाताई कांबळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top