मंगरूळे यांनी साधला धाराशिव,तुळजापूर,कळंब येथील विधिज्ञांशी संवाद

0
मंगरूळे यांनी साधला धाराशिव,तुळजापूर,कळंब येथील  विधिज्ञांशी संवाद

धाराशिव :- 
  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनी धाराशिव,तुळजापूर,कळंब येथील विधिज्ञांशी संवाद साधला.
  यावेळी भाजपचे इच्छुक उमेदवार बसवराज मंगरुळे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासाबाबत विधिज्ञांची मते जाणून घेत सामाजिक,शैक्षणिक,राजकिय कार्याचा अल्प परिचय करुन दिला.यावेळी बोलताना मंगरुळे म्हणाले की,उमरगा तालुक्यातील मुरुम या गावचा रहिवासी आहे.शिक्षणासाठी गांव सोडावे लागले.माझे महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले असून पुढे चालून  कर्मभुमिही तिच झाली. गेली 26 वर्षे भाजपचे निष्ठापूर्वक काम केले आहे.माझ्या कार्याची दखल घेऊन पक्षाने मला प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी दिली ती सक्षमपणे पार पाडले असल्याचे सांगत स्व.गोपीनाथजी मुंडे,केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षवाढीसाठी काम करताना आलेले अनेक अनुभव विधिज्ञ मित्रांसमोर कथन केले.छत्रपती संभाजीनगर येथे सुमारे 53 एकर क्षेत्रावर श्रीयश प्रतिष्ठानचे भव्य शैक्षणिक संकुल उभारता आले हे माझे सौभाग्य असून त्याच धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातही शैक्षणिक,औद्योगिक क्रांती घडवून तरुणासाठी रोजगाराच्या व व्यवसायाच्या नव-नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सांगितले.या संवाद भेटीस विधिज्ञ मंडळाचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. मंडळातर्फे बसवराज मंगरुळे यांचा सत्कार करून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

  यावेळी धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.रविंद्र कदम,उपाध्यक्ष ॲड.गिरवलकर, सचिव ॲड.शेरकर,ॲड.खंडेराव चौरे,ॲड. नितीन भोसले. ॲड. सारिका पाटील, ॲड. सौ. गवई, ॲड.कु. मैदाड, ॲड.स्वाती जोगडे, ॲड. पांडुरंग लोमटे, ॲड.परवेज काझी, ॲड. महेश चव्हाण, ॲड.राम गरड आदींसह विधिज्ञ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top