गुटख्याच्या माफियांचे मुस्क्या आवळा?अन्यथा अखिल भारतीय संघटना आवडणार मुसक्या.
जिल्हाभरात खुलेआम खुटका विक्री!
तुळजापूर प्रतिनिधी : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कर्नाटक आंध्रा तामिळ या विविध राज्यातून मोठ्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात .भाविक आल्यानंतर तुळजापूर शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटक्याची आयात व विक्री अवैद्यरित्या रोजगारासपणे केली जाते याला खतपाणी न घालता कारवाही केली जात नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने आज दिनांक 28 डिसेंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर व जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा .सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन धाराशिव यांच्या कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना साडी चोळी व बांगड्या भेट देऊन आगळवेगळे आंदोलन करण्यात आले
तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे तुळजापूर शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात जवळच असलेल्या कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा रोज राजपणे येत असतो ग्रामीण ग्रामीण भागात व शहरात गुटख्याचे मोठ्या प्रमाणात गोडवान आहेत या गोडवान मधून तुळजापूर मध्ये होलसेल प्रमाणात या गुटक्याची विक्री केली जाते .महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना पण फक्त कागदोपत्रावरच अधिकाऱ्यांकडून गुटखाबंदी दाखवली जाते .तुळजापूर शहरासह ग्रामीण भागात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजरोस पणे गुटक्याची होलसेल विक्री केली जाते . याला कोणत्याही प्रकारचा लगाम घातला जात नाही याच गुटख्यामुळे आज युवा पिढी वाईट दिशेने जात आहे बुटक्यामुळे तसेच कॅन्सर गंभीर स्वरूपात रोगाची शक्यता नाकारता येत नाही तसेच यापूर्वी वर्षानुवर्षे निवेदन देऊन पण कारवाई होत नाही .संबंधित अधिकारी व गुटखा माफी यांचा आर्थिक हितसंबंध आहेत का काय अशी शंका उपस्थित होती असेही बोलताना जिल्हाध्यक्ष गणेश पाटील हे बोलले .
सदर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अन्न व औषध प्रशासन धाराशिव येथे अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी देत रॅली ही काढण्यात आली होती या रॅलीमध्ये महिलावर्ग तसेच कार्यकर्ते मोठ्या संघटनेने उपस्थित होते .सदर काही प्रकारचं अनुसूचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मुख्य प्रदेश कार्याध्यक्ष आबासाहेब कापसे,तुळजापूर शहराध्यक्ष निखिल अमृतराव,तालुकाध्यक्ष बालाजी जाधव, माजी सैनिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय सोनवणे ,जिल्हा उपाध्यक्ष नेताजी शिंदे,महिला जिल्हाध्यक्ष उषाताई धकताडे ,लताताई आगळे यांच्यासह असंख्य अपंग बांधव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सदर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये पद निर्देशित अधिकारी व सहाय्यक आयुक्त एस बी कोंडकेगिरे यांनी लेखी स्वरूपाचे पत्र देऊन तुळजापूर येथील गुटखा बंदीच्या अनुषंगाने एक महिन्याच्या आत पोलिसांच्या मदतीने विशेष मोहीम राबवून समोर समुळ नष्ट करण्यात येईल .अशी लेखी स्वरूपाचे पत्र जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांना दिल्यानंतर आखिर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले आहे .या आंदोलनामुळे गुटखा माफी यांची धाबे दणाणले असून यापुढे अन्न भेसळ अधिकारी बळीचा बकरा कोणाला करणार किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार का? होलसेल विक्रेत्यावर कारवाई करणार याकडे जिल्ह्याची लक्ष लागून राहिले आहे .