ढोकी व आंबी पोलीस ठाणे हद्दीत चोरी गुन्हे दाखल

0



ढोकी व आंबी पोलीस ठाणे हद्दीत चोरी गुन्हे दाखल 

ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मनोज तुळशीराम भोसले, वय 32 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 9284 ही दि. 22.12.2023 रोजी 20.00 ते दि. 23.12.2023 रोजी 06.00 वा. सु. मनोज भोसले यांचे राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनोज भोसले यांनी दि.25.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आंबी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-नारायण दशरथ मस्तुद, वय 29 वर्षे, रा. माणिक नगर शेळगाव ता. परंडा  जि. धाराशिव यांचा अंदाजे 40,000₹ किंमतीचा एच पी कंपनीचा लॅपटॉप, हेडफोन, चार्जर हा दि. 03.12.2023 रोजी रोजी 08.00 वा. सु. नारायण मस्तुद यांचे राहात्या घरातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नारायण मस्तुद यांनी दि.25.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top